शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
पिंपळे सौदागर (Pclive7.com):- दहावी बारावीत पास होणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी नवनवीन क्षेत्र शोधायला हवेत असे मत मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केले. पिंपळे सौदागर येथील बासुरी बँक्वेट हॉल येथे आज (दि.२३) शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन आयोजित दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ तसेच करियर मार्गदर्शन शिबीर कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करतांना सांगितले की, आज या गुणवंत विद्यार्थ्यांनी आयुष्याची पहिली पायरी यशस्वीपणे पार करून दाखवले आहे. परंतु दिल्ली अभी दूर हैं.. आयुष्याच्या या प्रवासात एवढ्याश्या यशाने हरळून न जाता किंवा यशाची हवा आपल्या मेंदूत घुसू न देता आपल्या समोर येणाऱ्या पुढच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आपण सज्ज झाले पाहिजे. अशी आव्हाने पेलण्यासाठी यापुढील प्रवासाला योग्य दिशा देण्याची नितांत गरज असते, ती गरज अश्या मार्गदर्शन शिबिर मार्फत पूर्ण होत असते. यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नाही. उद्दीष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणजे यश आणि जर आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर याबाबत दुख: करीत बसू नका. कारण काळ बदलत असतो, यासाठी वारंवार प्रयत्न करा. सतत प्रगतिच्या दिशेने पाऊले टाकत रहा.
यावेळी अरुणराज जाधव यांनी पुढील काळात कोणतेही क्षेत्र निवडतांना विद्यार्थ्यांसमोरील पर्याय व आव्हाने याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्या मनात असलेल्या शंकाचे समाधानही केले. साधारण ५०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी यावेळी उपस्थित राहून या मार्गदर्शन शिबिराला सकारात्मक प्रतिसाद दिला.
यावेळी कार्यक्रमाचे आयोजक शत्रुघ्न काटे आणि प्रमुख पाहुणे म्हणून खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार अश्विनीताई जगताप, जेष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, जयनाथ काटे, राजेंद्र जगताप, चंद्रकांत अण्णा नखाते, मोरेश्वर शेडगे, रवी सांकला, जॉन्सन पौलेसे कीलकून, डॉ.श्री रोहन काटे, भानुदास काटे पाटील, प्रकाश झिंजुर्डे, बाळासाहेब (नाना) काटे, विजूदादा धनवटे, वसंत काटे, धनंजय भिसे, राम वाकडकर, IIB इन्स्टिटयूटचे महेश लोहारे, अरुण चाबुकस्वार, कैलास कुंजीर, प्रवीण कुंजीर, सुभाष भिसे, बाळकृष्ण परघळे, दीपक बोडके,श्रीमती शीतल पटेल, दिपक गांगुर्डे, संदीप फुके, समिर देवरे, विनोद सुर्वे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास (भोला) काटे आणि श्रीमती उषा भारद्वाज यांनी केले.