पिंपरी (Pclive7.com):- जुन्या भांडणाच्या रागातून चार जणांनी मिळून एका फळविक्रेत्याला मारहाण केली. ही घटना गुरुवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास पिंपरी येथे घडली. कुणाल सुरेश केसवानी (वय ३०, रा. खुशबू हॉटेलजवळ, पिंपरी) यांनी शुक्रवारी (दि. २१) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सागर बंबानी (वय ३२, रा. अशोक थिएटरजवळ, पिंपरी गाव), हियाद (वय ३०) आणि इतर दोघेजण (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी कुणाल यांच्याशी पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून लोखंडी रॉड, तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले.





















Join Our Whatsapp Group