पिंपरी (Pclive7.com):- खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्या पुतण्याने भरधाव कार चालवत एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुणे-नाशिक महामार्गावर मध्यरात्री हा अपघात घडला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमर मोहिते असे त्याचे नावे आहे. या अपघातात ओम भालेराव (वय 19 वर्ष) तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, आमदार मोहितेंचा पुतण्या पुण्याच्या दिशेने कार घेऊन भरधाव निघालेला होता. विशेष म्हणजे तो रस्त्याच्या विरुद्ध बाजूने अतिशय वेगात बेदरकारपणे जात होता. समोरून एक दुचाकी येत होती. या दुचाकीला त्याच्या कारची धडक बसली.
अपघात इतका भीषण होता, की दुचाकी हवेत उडाली आणि दुचाकीवरील तरुण रस्त्याच्या कडेला उडून पडले. या भीषण अपघातात दुचाकीचा चुराडा झाला असून कारचे देखील नुकसान झाले आहे.






















Join Our Whatsapp Group