पिंपरी (Pclive7.com):- फॉर्च्युन वास्तुशिल्प समूह आणि पृथ्वीराज थिएटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन हिंदी चित्रपट गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पृथ्वीराज थिएटर्सच्या संचालिका दया इंगळे यांनी दिली.
सध्याच्या कठिण प्रसंगात गायक, गायिका सर्व संगीत प्रेमिकांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी व त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या गायन स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश निशुल्क आहे.
या स्पर्धेसाठी म्युझिकल स्टार एफ बी पेज राजकोट गुजरात आणि सामाजिक संस्था साथ फाउंडेशन तांदुळजा, हिंगोली, महाराष्ट्र यांचे सहकार्य लाभले. गट 1. वय 18 पेक्षा कमी सर्व मुले, मुली.2. वय 18 ते 50 महिला व पुरूष. 3. वय 50 पेक्षा अधिक स्त्री/पुरुष.
या स्पर्धेत प्रत्येक गटात प्रथम बक्षीस दहा हजार, द्वितीय पाच हजार, तर तृतीय क्रमांकासाठी तीन हजार तसेच २ उत्तेजनार्थ विजेत्यांना प्रत्येकी १ हजार रुपयाचे रोख बक्षीस, ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येईल.
पुरस्कार प्राप्त गायकास फॉर्च्युन वास्तुशिल्प, पृथ्वीराज थिएटर्स, म्युझिकल स्टार व साथ फौंडेशन तांदुळजा या चारही फेसबुक पेज वर दोन गीत लाईव्ह/रेकाॅर्डेड गीत गाण्याची संधी देण्यात येईल.
स्पर्धेचे नियम..
स्पर्धकांनी आपल्या आवाजातील एकच गाणे दोन वेळा रेकॉर्ड करून पाठवावे. एक कराओके ट्रॅकवर किंवा लाइव्ह वादकांसोबत आणि दुसर्यांदा तेच गाणे विना संगीत व्हिडिओ रेकाॅर्डीग करून हे दोन व्हिडिओ [email protected] या पत्त्यावर मेल करायचा आहे. किंवा 8668496268 या क्रमांकावर व्हाटस एप करावयाचा आहे.
गायलेले हिंदी गाणे व स्वतःची माहिती, आधार कार्ड प्रत एकाच मेलमध्ये पाठवावी. कोणत्याही मोबाइल ॲपवर रेकॉर्डिंग केलेले गाणे ग्राह्य धरले जाणार नाही. यासाठी अंतिम तारीख दि.२० जून २०२१ पूर्वी दु.१२ वाजेपर्यंत मेलद्वारे पाठवावे. काही शंका असेल तर श्रीमती रूपा पाटील – मो.7720863333 यावर संपर्क करावा.