पिंपरी (Pclive7.com):- रुपीनगर व ताम्हणेवस्ती भागात विजपुरवठा करणाऱ्या केबलमध्ये वारंवार बिघाड होत असल्यामुळे काल सायंकाळ पासून सुमारे ५०० घरांचा विज पुरवठा २० तासापासून बंद होता. त्याच्या निषेधार्थ महावितरणच्या भोसरी कार्यालयावर शिवसेनेने आज ठिय्या आंदोलन केले.
जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, शहरप्रमुख सचिन भोसले, विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, जिल्हा सनियंत्रण समिती सदस्य संतोष सौंदणकर यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख नितिन बोंडे, शाखाप्रमुख प्रवीण पाटील, सहदेव चव्हाण, युवसेना उपविधानसभा अधिकारी सुनिल समगिर, युवासेना विधानसभा चिटणीस अमित शिंदे, जेष्ठ शिवसैनिक रमेश पाटोळे यांनी भोसरी डिव्हिजन ऑफिस मध्ये ठिय्या आंदोलन केले.
कार्यकारी अभियंता श्री.गवारे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता चौधरी, सहाय्यक अभियंता हुलसुलकर यांनी अधीक्षक अभियंता श्री.तगदपल्लीवर यांच्याशी सविस्तर चर्चा करून १५० मीटर नवीन केबल दिल्यानंतर शिवसेना शिष्टमंडळाच्या मागणीस यश आले व आंदोलन स्थगित करण्यात आले. आंदोलना दरम्यान प्रशासकीय अधिकारी यांनी सहकार्य केल्यामुळे शिवसेना शाखा रुपीनगर यांनी प्रशासनाचे आभार मानले.
























Join Our Whatsapp Group