पुणे (Pclive7.com):- दहावीच्या परीक्षा न होताच अकरावी प्रवेशासाठी सी.ई.टी. घेण्याचा निर्णय शासनाने जाहीर केल्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती कशी हाताळावी याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी पुण्यातील ‘ए.बी.ज् करियर ॲकॅडमी’तर्फे ‘दहावी सी.ई.टी.ला सामोरे जाताना…’ या विषयावरील विनामूल्य लेक्चर सिरीजचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातील पहिले व्याख्यान येत्या रविवारी (११ जुलै) सायंकाळी ऑनलाईन होणार आहे.
दहावीच्या परीक्षांऐवजी सीईटी पहिल्यांदाच होत आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालक गोंधळलेले आहेत. हे सारे कधी होणार, कसे होणार या अनिश्चिततेमुळे मानसिक तणावही आहे. त्यामुळे ही परिस्थिती कशी हाताळावी, याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी या विनामूल्य लेक्चर सिरीज आयोजित करण्यात आली आहे.
या सिरीज मधील पहिले ऑनलाईन व्याख्यान “विद्यार्थी / पालकांनो, मानसिक ताण कसा हाताळाल?” या विषयावर होणार आहे. त्यात “ज्ञानप्रबोधिनीज् इन्स्टिट्यूट ऑफ सायकॉलॉजी”च्या संचालक आणि ‘युथ सायकॉलॉजी’ विषयाच्या संशोधक डॉ. अनघा लवळेकर या मार्गदर्शन करणार आहेत. हे व्याख्यान रविवार, ११ जुलै २०२१ रोजी सायं. ५.३० वाजता होणार आहे. ते सर्वांसाठी खुले व विनामूल्य आहे.
त्यासाठी https://bit.ly/3hkBoB2 या लिंकवर माहिती भरून विद्यार्थी नावनोंदणी करू शकतात किंवा https://www.facebook.com/absacademy44/ या फेसबुक पेजवर कार्यक्रम लाईव्ह पाहू शकतात, अशी माहिती ‘ए.बी.ज् करियर ॲकॅडमी’चे संचालक श्री. भूषण ओझर्डे यांनी दिली.





















Join Our Whatsapp Group