पिंपरी (Pclive7.com):- रोटरी क्लब ऑफ निगडीच्या अध्यक्षपदी जगमोहन सिंग तर सचिवपदी सुहास ढमाले यांची निवड करण्यात आले. रावेत येथे झालेल्या कार्यक्रमात जगमोहन सिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांना रोटरीचे प्रांतपाल पंकज शहा यांनी पदाची शपथ दिली.
नव नियुक्त अध्यक्ष जगमोहन सिंग यांनी मावळते अध्यक्ष डॉ. प्रवीण घाणेगावकर यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी तसेच मावळते सचिव हरबिंदर दुल्लत यांच्याकडून नवनिर्वाचित सचिव ढमाले यांनी पदभार स्वीकारला. मावळत्या फर्स्ट लेडी रो. डॉ. सुनंदा घाणेगावकर यांनी नवनिर्वाचित फर्स्ट लेडी रो.हरदीप कौर यांचे स्वागत केले. प्रमुख पाहुणे प्रांतपाल रो. पंकज शहा व रो. प्रिया शहा यांनी उपस्थिती लावली.
नवनिर्वाचित कार्यकारी पदाधिकारी रो. प्रणिता अलूरकर, रो. हरविंदर सिंग, केशव माणगे, रो.अंकुश पाटील, रो. जयंत येवले, रो.आरती मुळे, रो. शशांक फडके, रो. डॉ.रवींद्र कदम, रो. गुरूदीप सिंग, रो.दया सागर, रो.राकेश सिंघानिया, रो. सुभाष जयसिंघानी, रो. रवी हिरेमठ, रो.डॉ शुभांगी कोठारी, रो. रवींद्र राजापूरकर, रो. श्रीकृष्ण करकरे, रो. प्रमोद देशमुख, रो. डॉ संजय देवधर यांनी आपल्या पदाची शपथ देण्यात आली.
नियोजित अध्यक्ष रो. प्रणिता आलूरकर यांनी आभार प्रदर्शन केले. रो. सविता राजापूरकर यांनी सूत्रसंचालन केले.






















Join Our Whatsapp Group