पिंपरी (Pclive7.com):- चिपळूण येथे आलेल्या आस्मानी संकटामुळे अनेकांची संसार उध्वस्त झालेत. आलेल्या महापूरामुळे नागरिकांच्या घरातील अन्नधान्य पाण्यात वाहून गेल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलीयं. राज्य सरकार सर्व ती मदत करत आहेच. परंतू आपले कर्तव्य म्हणून भोसरी विधानसभा शिवसेना महिला विभाग संघटिका सौ. रूपालीताई आल्हाट व भोसरी विधानसभा शिवसेना समन्वयक परशुराम गंगाराम आल्हाट यांनी या पूरग्रस्तांना मदतीचा हात दिलायं.
आल्हाट दांम्पत्याने आपले कर्तव्य म्हणून २०० बॅाक्स बिस्किट, २०० बॅाक्स बिसलेरी, गहू, तांदुळ आदी जीवनावश्यक वस्तू माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण वासियांना पाठवले आहे. तेथील आमदार भास्करराव जाधव यांच्याकडे हे साहित्य सुपूर्त करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, गुहागरचे आमदार भास्कर जाधव, रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव आदी उपस्थित होते.
या मदत कार्याचे साहित्य परशुराम आल्हाट यांनी स्वत: पूरग्रस्तांपर्यंत पोहचविले. त्यांच्या या कार्यास अशोक आल्हाट, विजय आल्हाट, वासुदेव आल्हाट, शंकर आल्हाट, रवि भुजबळ, आनंद भुजबळ, आनंद कदम, राजेश भुजबळ, अभिषेक भुजबळ, सचिन आल्हाट, तुषार आल्हाट, अमित आल्हाट, ॲड.संकेत चावरे, विनायक आल्हाट, मनोज आल्हाट, वासुदेव आल्हाट, संकेत आल्हाट, अक्षय आल्हाट, कृष्णा झोंबाडे, मनोज झोंबाडे आदींचे मोठे सहकार्य लाभले.

























Join Our Whatsapp Group