पिंपरी (Pclive7.com):- स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट चारने छापा मारून कारवाई केली. यामध्ये सहा महिलांची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई गुरुवारी भुमकर चौक, वाकड येथील ऑनर वेलनेस स्पा येथे करण्यात आली.
संतप्रताप रमाप्रताप सिंग (वय ३७, रा. साने चौक, चिखली) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासह एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक अंबरीश देशमुख यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुमकर चौक वाकड येथील व्हिजन मॉल मध्ये असलेल्या ऑनर वेलनेस स्पा या स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पोलिसांना मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी या स्पा सेंटरवर छापा मारून कारवाई केली. त्यात सहा महिलांची सुटका करण्यात आली आहे. आरोपींनी या सहा पीडित महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केले असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
























Join Our Whatsapp Group