पिंपरी (Pclive7.com):- फुगेवाडीतील विठ्ठल मंदिराशेजारी एक घर शनिवारी सकाळी कोसळले. या घराच्या ढिगाऱ्याखाली चौदा वर्षीय मुलगी अडकली. मात्र, युद्धपातळीवर बचावकार्य राबविल्याने मुलीला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
फुगेवाडीतील स्पोर्ट्स क्लब मंडळाजवळ हे घर असून शनिवारी कुटुंबातील सदस्य घरात असताना अचानक घर कोसळले. त्यावेळी घरात माहिलेसह त्यांच्या दोन मुली होत्या. घराचा छत कोसल्यानंतर महिला व एक मुलगी बाहेर पडली. मात्र, पौर्णिमा ढिगाऱ्याखाली अडकली. घराचे छत व भिंती पडल्याने मोठा ढिगारा होता.
घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान व पोलिस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांसह बचावकार्य सुरु झाले. अरुंद जागा असल्याने बचाव कार्यात अडथळा येत होता. काही वेळाने मुलीला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर त्या मुलीला सुखरूप बाहेर काढण्यात आले. मुलीला बाहेर सुखरूप काढता क्षणी नगरसेवक राजू बनसोडे यांनी उचलून घेत त्यांचे अभिनंदन केले व पूर्ण पोलीस प्रशासन अग्निशामक दल व रेस्क्यू टीम डॉक्टरांची टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. त्याप्रसंगी नगरसेविका स्वाती माई काटे, शेखर काटे, युवासेनेचे निलेश हाके व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.


























Join Our Whatsapp Group