लोणावळा (Pclive7.com):- मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर खोपोलीजवळ बोर घाटात एक भीषण अपघात झाला आहे. आज दि. १८ ऑक्टोबर रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात तिघेजण ठार झाले तर सहा प्रवासी जखमी झाले आहेत.
मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर कोंबडी वाहून नेणाऱ्या टेम्पोने पुढच्या टेम्पोला धडक दिली. त्यानंतर एक दोन नाही तर तब्बल सहा वाहने एकमेकांवर आदळली यामध्ये दोन टेम्पो, दोन कार, खाजगी बस आणि ट्रेलर एकमेकांवर आदळले.
अपघातामुळे वाहतूक काही काळ विस्कळित झालेली वाहतूक आता सुरळीत आहे. जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.