पिंपरी (Pclive7.com):- काही महिन्यापूर्वी स्मशानभूमीसाठीची मागणी आपण सकारात्मक विचार करून स्मशानभूमीच्या विकास कामासाठी पंधरा कोटीचा निधी तीन टप्प्यांमध्ये मंजूर केला आहे. त्याच प्रमाणे यमुनानगर रुग्णालयात विविध सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णालयाचे नूतनीकरण करणे गरजेचे आहे. कारण जेव्हा पासुन रुग्णालय अस्तित्वात आले तेव्हा पासुन यमुनानगर रुग्णालयाकडे कायम महानगरपालिकेकडून दुर्लक्ष करण्यात आलेला आहे.
नेहमीच किरकोळ स्वरूपाचा निधी देण्यात आला. त्यामुळे भौतिक सुविधा विकास करण्यासाठी पाच कोटींचा निधी देण्यात यावा अशी मागणी नगरसेवक प्रा.उत्तम केंदळे यांनी फ प्रभागात झालेल्या बैठकीत आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली होती. त्यानुसार (दि.२६) रोजी पत्राद्वारे आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे मागणी केली आहे.
केंदळे यांनी पत्रकात म्हटले आहे की, गोरगरीब रुग्णांसाठी यमुनानगर रुग्णालय संजीवनी आहे. रुपीनगर, तळवडे, सेक्टर नंबर 22, निगडी, यमुनानगर, त्रिवेणीनगर, सहयोगनगर या भागातील नागरिक खाजगी रुग्णालयात न जाता विश्वासाहर्ता जपल्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असतात. महिला प्रसूतिगृह, ओपीडी वगैरे इतर अनेक उपचार याठिकाणी होतात. करोनाचे लसीकरण या ठिकाणी होत आहे.
परिसरातील रुग्णांची गर्दी पाहता या ठिकाणी जागा अपुरी पडत आहे. रुग्णालयाची जागा आणि सोयी सुविधा मिळत नसल्याने रुग्णाचे हाल होत आहेत. परिसरातील रुग्णांची संख्या लक्षात घेता येथे नव्याने तात्पुरत्या स्वरूपातील रूम बांधणे अपेक्षित आहे. करोना काळातही या दवाखान्याने रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या ठिकाणी दवाखान्याच्या आजूबाजूला मोकळी जागा आहे.
काही महिन्यापूर्वी मी मागणी केलेल्या स्मशानभूमीसाठी तीन टप्प्यात आपण पंधरा कोटी मंजूर केले आहेत. त्याचप्रमाणे यमुनानगर रुग्णालयासाठी पाच कोटीच काम काढावे अशी मागणी फ प्रभागात झालेल्या बैठकीत नगरसेवक उत्तम केंदळे यांनी आयुक्तांकडे केली आहे.
केंदळे यांच्या मागणीचा विचार करता यमुनानगर रुग्णालय विकसित करण्यासाठी आयुक्त राजेश पाटील यांनी अनुकूलता दर्शवली आहे. यामुळे नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.
























Join Our Whatsapp Group