पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड मध्ये किरीट सोमय्या भेटी दरम्यान शिव सेना कार्यकर्त्यांनी किरीट सोमय्या यांना काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी केली.
त्याला भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रत्युत्तर दिल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
तत्पूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सोमय्या यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. त्याच बरोबर अर्जुन खोतकर यांचा जालना सहकारी साखर कारखान्याशी थेट संबंध असल्याची टीका करतानाच ज्या पद्धतीने जरंडेश्वर कारखाना खरेदी केला गेला त्याच पद्धतीने जालना कारखाना खरेदी केल्याचा आरोप करत सोमय्या यांनी अर्जुन खोतकर यांच्या चौकशीची मागणी केली.
याच करखान्या मध्ये अजित सीड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा हिस्सा आहे आणि या कंपनीचे समभाग विश्वास नांगरे पाटील यांच्या पत्नी रुपाली नांगरे पाटील आणि सासऱ्यांकडे असल्याचा आरोप करतानाच चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत विश्वास नांगरे पाटील यांना पोलिस सेवेतून मुक्त करावे आणि जालना कारखाना प्रकरणी सीबीआय किंवा उच्च नाययल्याच्या न्यायाधीशनच्या अध्यक्षतेखाली चौकशी करावी अशी मागणी सोमय्या यांनी केली.
विधानसभा व्यवस्तिथ चालू दिली तर आम्ही आक्रमक पणे भ्रष्टाचाराचा मुद्दा मांडू आणि अविश्वास ठराव आणण्याचा प्रयत्न करू असेही किरीट सोमय्या म्हणाले.

























Join Our Whatsapp Group