पिंपरी (Pclive7.com):- : महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराजांनी आयुष्यभर समाजासाठी काम केले. समाजाला दिशा दिली. पुरोगामित्वाचा पाया रचला. नवीन पिढीला खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकर यांचा विचार पोहोचणे ही काळाची गरज आहे. फुले, शाहूसृष्टीच्या माध्यमातून महापुरुषांचे विचार जनतेपर्यंत पोहचवावेत, असे आवाहन युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केले.
पिंपरी चिंचवड महापालिका फार श्रीमंत असल्याचे ऐकून होतो. पण, श्रीमंती ही नुसती पैशांनी होत नाही. श्रीमंती विचाराने होते आणि महापालिका शाहूसृष्टीच्या माध्यमातून महापुरुषांचे विचार पेरणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने तुमची श्रीमंती वाढली असेही ते म्हणाले.
महापालिकेतर्फे उभारण्यात येत असलेल्या महात्मा जोतिराव फुले स्मारक येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा, फुलेसृष्टी आणि केएसबी चौकातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यामागे उभारलेल्या शाहूसृष्टीच्या कामाचे छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. त्यावेळी ते बोलत होते.
महापौर उषा ढोरे, आमदार महेश लांडगे, उपमहापौर हिरानानी घुले, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे, माजी उपमहापौर तुषार हिंगे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

























Join Our Whatsapp Group