पिंपरी (Pclive7.com):- बँकेतील फिक्स डिपॉझिट आणि खातेदाराच्या २५ लाख तीन हजार २३३ रुपयांचा बँकेने अपहार केला म्हणून दि सेवा विकास को ऑपरेटिव्ह लिमिटेड संभाजीनगर शाखा या बँकेचे चेअरमन, संचालक आणि बँक अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.
याप्रकरणी तरुण गुलजारीलाल शर्मा (वय ३८, रा. शाहूनगर, चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि सेवा विकास को ऑपरेटिव्ह बैंक लिमिटेड या बँकेच्या संभाजीनगर शाखेत फिर्यादी यांनी त्यांच्या सहा फिक्स डिपॉझिट, त्यांच्या आईच्या सहा फिक्स डिपॉझिट आणि वडिलांच्या नावावरील एक पावती अशा एकूण १३ फिक्स डिपॉझिटचे पैसे बँकेत ठेवले होते. तसेच त्यांच्या बचत खात्यावर देखील काही पैसे होते.
फिर्यादी यांचे एकूण २५ लाख तीन हजार २२३ रुपये बँकेत जमा होते. फिर्यादी यांनी ते पैसे बँकेकडे वारंवार मागूनही बँकेने ते परत दिले नाहीत. फिक्स डिपॉझिटची रक्कम सुरक्षित ठेवणे बँकेला बंधनकारक असताना त्याकडे दुर्लक्ष करून फिर्यादी यांच्या फिक्स डिपॉझिट रकमेचा अपहार करून फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

























Join Our Whatsapp Group