पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्र.२८ रहाटणी पिंपळे सौदागर येथील जगताप डेअरी साई चौक येथील ग्रेड सेपरेटर व पिंपळे सौदागर मधील सौदागर स्पोर्ट्स संकुलचे उद्घाटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते करणेबाबतचे मागणी पिंपरी-चिंचवडचे आयुक्त राजेश पाटील यांना प्रभागाचे विद्यमान नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे व नगरसेविका शीतल काटे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
नाना काटे निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्र.२८ रहाटणी – पिंपळे सौदागर येथील जगताप डेअरी साई चौक येथे नाशिक फाटा ते हिंजवडी या बीआरटीएस मार्गावर पिंपळे सौदागर ते वाकड व पिंपळे निलख मार्गाला जोडणार्या ग्रेड सेपरेटरचे काम पूर्ण झालेले आहे. या ग्रेट सेपरेटरचा एक मार्ग काही दिवसापूर्वी खुला करण्यात आलेला आहे, या मार्गावर वाहनाची खूप वर्दळ असते या मार्गावरून हिंजवडीला जाणारा व येणारा खूप मोठा वर्ग आहे. त्यांना या मार्गाचा खूप उपयोग होईल व वाहतूक कोंडीतून सुटका होईल. येथील दुसऱ्या ग्रेड सेपरेटरच्या मार्गाचे काम देखील पूर्ण झालेले असून त्याचे उद्घाटन करून तो नागरिकांसाठी खुला करण्यात यावा.
तसेच पिंपळे सौदागर येथील आरक्षण क्र. ३६७ अ येथे बहुउद्देशीय खेळाचे मैदान विकसित करण्यात आले आहे. या मैदानामध्ये रंनिग ट्रॅक, क्रिकेट, टेनिस, ओपन जिम, फुटबॉल, व स्पोर्ट्स म्यूरल इत्यादी खेळांचा प्रकारचे ग्राउंड विकसित करून ते पूर्ण झालेले आहे. त्याचे देखील उद्घाटन करून नागरिकांसाठी खुले करण्यात यावे.
जगताप डेअरी साई चौक येथील ग्रेड सेपरेटर व पिंपळे सौदागर येथील सौदागर स्पोर्ट्स संकुलचे उद्घाटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात यावे अशी मागणी आयुक्तांच्याकडे माजी विरोधी पक्षनेते व नगरसेवक नाना काटे यांनी केले आहे.

























Join Our Whatsapp Group