पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथे येत्या तीन महिन्यात BMX पार्क साकारणार असल्याची माहिती माजी विरोधी पक्षनेते तथा स्थानिक नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी दिली आहे.
पिंपळे सौदागर येथील पी.के. चौक ते यशदा चौक HCMTR मधील जागेत BMX पार्क प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या नियोजित प्रकल्पाची नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी अधिकाऱ्यांसह आज पाहणी केली.
या प्रकल्पाचे वैशिट्य म्हणजे पार्क 463 लांब व 30 मीटर रुंद असणार आहे. Bicycle motocross हा प्रकार adventure sports मध्ये मोडतो. Adventure sports खेळणाऱ्या नवीन खेळाडूसाठी रेसर्स व कमी उंचीच्या जंपसह BMX ट्रॅक नियोजित आहे. BMX बाईक ऑफ रोड रेसिंगसाठी असते हा पंप ट्रॅक लाल माती, डांबर अथवा बिटूमेनपासून बनवली जातो.
एका ट्रॅकमुळे एका वेळी जास्तीत जास्त 8 खेळाडू हा ट्रॅक वापरू शकतात. ट्रॅक मध्ये सुरवातीच्या पॉइंट पासून समाप्त लाइन पर्यंत विविध जंप आणि रोलर्स असतात. या पार्क मध्ये पीके चौकातून प्रवेश असेल तसेच यामध्ये पालकांसाठी बैठक व्यवस्था असेल. तसेच रेसिंग ट्रॅकसाठी व्ह्यूइंग् गॅलरी ,कॅफेटेरिया,सेल्फी पॉईंट व पार्किंग व्यवस्था असणार आहे.
रनिंग, स्केटिंग ट्रॅक असेल व या खेळा संबंधी माहिती व शिकविण्यासाठी ट्रेनर असेल. अशा या नाविन्यापूर्ण व सोयी सुविधा युक्त प्रकल्पाची विद्यमान नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी केली. यावेळी स्मार्ट सिटी जनरल मॅनेजर अशोक भालकर, कार्यकारी अभियंता मनोज सेठिया, आर्किटेक्ट श्रुती शहा, बी.जी. शिर्के कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर विजय बांदल, तानाजी चव्हाण, अनिकेत धायगुडे आदी उपस्थित होते.


























Join Our Whatsapp Group