पिंपरी (Pclive7.com):- आज जागतिक महिला दिनानिमित्त संपूर्ण देशामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. आजच्या या महिला दिनाचे औचित्य साधून कुदळवाडी येथे स्विकृत सदस्य दिनेश यादव व इंद्रायणी महीला प्रतिष्ठानच्या अध्यक्ष निशाताई दिनेश यादव यांच्या वतीने कुदळवाडी येथे यांच्या शुभ हस्ते पिंपरी चिंचवड साफसफाई महिला कर्मचारी यांचा सत्कार भेटवस्तू देऊन करण्यात आला. तसेच या वेळी उपस्थित सफाई कामगारांना आरोग्य विषयी तसेच स्वछते विषयी मागर्दशन केले.

तसेच सर्व महिला भगिनीं सोबत चहा नाश्ता केला. त्यांच्या अडचणी जाऊन घेतल्या कुटुंबातील सदस्यांची विचारपूस केली. एक कौटुंबिक स्नेह मेळावा असल्याचे वातावरण यावेळी निर्माण झाले होते. सर्व कर्मचारी महिला भगिनींनी निशा यादव व दिनेश यादव यांचे आभार मानले.
























Join Our Whatsapp Group