पिंपरी (Pclive7.com):- कुदळवाडी – चिखली भागातील सर्व नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आजुबाजुच्या परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे. त्याच प्रमाणे डास, मच्छर, माश्या याची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना डेंग्यू, मलेरिया, ताप अशा आजारांचा सामना करावा लागत असून अनेक लहान मुले आजारी पडत आहे.

पावसाळ्याच्या पुर्वी सर्व ठिकठिकाणी पाहणी करुन ते स्वच्छ करण्यासाठी सुरुवात करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे नाल्यामध्ये खोलीकरण करुन संपुर्ण गाळ बाहेर काढला पाहिजे. त्यामुळे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत होईल. त्यांमुळे आजुबाजुच्या परिसरात बोर, विहीरी यांची पाणी पातळी वाढेल.
सध्या पाणी जिरवण्यासाठी फक्त ओढे, नाले, व नदी हीच ठिकाणी शिल्लक आहेत. त्यामुळे नालेसफाई प्रमाणे खोलीकरण देखील महत्त्वाचे आहे लवकरात लवकर नालेसफाई ला सुरूवात करण्यात आली. यावेळी स्वीकृत सदस्य दिनेश यादव, सुरज गंडसिग, दिपक घन व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
























Join Our Whatsapp Group