मुंबई (Pclive7.com):- महाराष्ट्राला दिलासा देणार बातमी आहे. राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये आजपासून पुढचे चार दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर बहुतांश ठिकाणी पावसानं हजेरी लावण्यास सुरुवातही केली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरसह सांगली, सातारा आणि सोलापुरात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

तर मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबादसह नांदेडमध्येही पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. तर कोकणात रायगड, सिंधुदुर्ग आणि मराठवाड्यातील बीडमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर तिकडे भंडारा जिल्ह्यात रविवारी रात्री जोरदार पावसानं हजेरी लावली.
मान्सूनसाठी अनुकूल वातावरण तयार होऊ लागलंय. त्यामुळे केरळसह अंदमान निकोबारमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. पुढचे दोन दिवस केरळ किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस बरसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
























Join Our Whatsapp Group