पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिकच्यावतीने मार्च २०२२ मध्ये घेतलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि.१७) दुपारी १ वाजता जाहीर झाला आहे. पिंपरी चिंचवड शहराचा निकाल ९७.७३ टक्के लागला आहे.

यंदा ऑफलाइन परीक्षा झाल्यामुळे निकालाबाबत मोठी उत्कंठा होती. मुलींनी निकालात बाजी मारली. मुलांचा निकाल ९७.१७ टक्के तर मुलींचा निकाल ९८.३९ टक्के लागला आहे. पुर्नपरीक्षार्थ्यांचा ४९.५२ टक्के निकाल लागला आहे. तब्बल १२४ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

शहरात दहावीच्या परीक्षेला १८८ शाळांमधून एकूण १९ हजार ६७४ विद्यार्थी बसले होते. यामध्ये १० हजार ६१६ मुले व ८ हजार ९७८ मुली परीक्षार्थी होत्या. त्यातून १० हजार ३१६ मुले व ८ हजार ८३४ मुली उत्तीर्ण झाल्या. एकूण १९ हजार १५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
Tags: Maharashtra SSC Result 2022Pimpri Chinchwad Ssc Resultदहावी निकालदहावी परिक्षापिंपरी चिंचवडविद्यार्थी





















Join Our Whatsapp Group