पिंपरी (Pclive7.com):- गेली ३ महिने काम करुन देखील विकास जाधव या कामगारास ठेकेदाराने पगार मिळाला नव्हता. यानंतर या कामगाराने पिंपरी युवाअधिकारी निलेश हाके यांच्याशी संपर्क साधुन सर्व माहिती सांगितली. त्यानंतर निलेश हाके यांनी संबंधीत ठेकेदारास प्रत्यक्ष भेटुन युवासेनेचा दणका दिल्यानंतर संबंधीत ठेकेदाराने कामगारास ३ महिन्याचे रखडलेले ३६,००० रुपये त्वरीत अदा केले.
त्यामुळे कामगार विकास जाधव यांनी श्रीसाई मंदीर दापोडी येथे येऊन निलेश हाके यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला व आभार मानले. यावेळी प्रमोद गायकवाड, राहुल जाधव, हाजी शेख, अरविंद ओव्हाळ, अप्पा गायकवाड, इमाम भाई शेख उपस्थित होते.