पिंपरी (Pclive7.com):- स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी डॉ. धनंजय जाधव यांची स्वराज्य संघटनेच्या मुख्य प्रवक्ते म्हणुन निवड केली आहे.

अत्यंत साधारण कौटुंबिक परिस्थितीची पार्श्वभूमी, गडकिल्ले, मराठा आरक्षणासाठी महत्वपुर्ण कार्य, अनेक आंदोलने व निवेदनांच्या माध्यमातून शासन दरबारी मागण्या सोडवण्यासाठीची आत्मीयता व आपल्या सोबतचे बांधव आर्थिक सक्षम होण्यासाठीची तळमळ व वृक्षसेवेची कामाची दखल घेवून डॉ. धनंजय राजाराम जाधव यांची स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी “स्वराज्य”च्या प्रवक्ते पदी निवड केली आहे.
डॉ.धनंजय जाधव आपण शिव-शाहू छत्रपती महाराजांच्या विचाराने वंचित सोशितांचे प्रश्न सोडविण्यासाठी नक्कीच योग्य भूमिका मांडतील याची खात्री वाटते, अशी भावना त्याचे कार्यकर्ते अमोल वीर PC live शी बोलताना व्यक्त केली.
























Join Our Whatsapp Group