पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्रातील जनतेचा राज्यपालांनी अपमान केला आहे. गुजरात व राजस्थान मधील नागरिकांमुळेच मुंबईला महत्त्व असल्याचे बेताल वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले आहे. त्यांच्या विरोधात पिंपरी युवासेनेच्या वतीने दापोडी येथे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे.

वेळो वेळी वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत असणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काल महाराष्ट्रात राहुन महाराष्ट्र राज्याचा अपमान करणारे वक्तव्य केले. त्यामुळे संपुर्ण महाराष्ट्रातील जनता व मराठी माणूस संतापला आहे, त्यात शिवसेना व युवासेना देखील आक्रमक होताना पिंपरी विधानसभेत दिसून आले. राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत राज्यपाल यांना केंद्राने परत बोलुन घ्यावे व महाराष्ट्राला नवीन राज्यपाल द्यावे, यासाठी महाराष्ट्रभर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने स्वाक्षरी मोहीम आज घेण्यात आली.

पिंपरी युवासेनेचे युवाअधिकारी निलेश हाके यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी विधानसभेतील दापोडी येथे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. यात सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवीला.
यावेळी शिवसेनेचे उपशहरप्रमुख तुषार नवले, शीला मामी जाधव, एकनाथ हाके, मंदार तांबे, विनोद जाधव, रामभाऊ शिंगोटे, अंकुश मामा जाधव, सुनील ओव्हाळ, तृतीय पंथचे पापा सय्यद, मनोज काची, ऍड. मनोज गायकवाड, मोसीन शेख, राहुल जाधव, अजय कदम, ज्ञानेश्वर मते, अमर अडसुळे, स्वप्नील शेवाळे, शिवा काची, अथर्व शिंदे, लक्ष्मण शिवशरण, सचिन कोष्टी, शिवसैनिक व युवासेना सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
























Join Our Whatsapp Group