आळंदी (Pclive7.com):- आळंदी येथे शिवसेना, युवासेना व महाविकास आघाडीच्या वतीने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा आज जाहिर निषेध करण्यात आला.

महाराष्ट्र व मराठी माणूस याबद्दल गैरवक्तव्य केल्या प्रकरणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा आळंदी येथे जाहीर तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. जय भवानी जय शिवाजी.. राज्यपाल गो बॅक.. राज्यपाल यांचा निषेध असो..! अशा घोषणाही यावेळी शिवसैनिकांनी दिल्या.

याप्रसंगी शिवसेनेचे जेष्ठ नेते उत्तमराव गोगावले, माजी नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, शहरप्रमुख अविनाश तापकीर, माजी नगरसेवक आनंदराव मुंगसे, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक प्रकाशशेठ कुऱ्हाडे पाटील, काँग्रेसचे नेते उमेश रानवडे, शिवसेना उपशहरप्रमुख राहुल सोमवंशी, शशिकांत राजे जाधव, मंगेश तीताडे, आशिष गोगावले, युवासेना उपशहर अधिकारी चारुदत्त रंधवे, विभागप्रमुख संदीप पगडे, शाखाप्रमुख राकेश जाधव, प्रसिद्धीप्रमुख अनिकेत डफळ, संपर्क प्रमुख बालाजी शिंदे अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
























Join Our Whatsapp Group