पिंपरी (Pclive7.com):- काळेवाडी येथील विद्यादीप शिक्षण संस्था संचालित ‘माने स्कूल’ काळेवाडी पुणे १७ या विद्यालयातील इयत्ता १० वी मधील प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेला विद्यार्थी श्रेयश श्रीपाद कुलकर्णी याने ‘नीट’च्या परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.

श्रीपाद कुलकर्णी याने २०२२ मध्ये नीट च्या परीक्षेत ६३० गुण मिळवून M.B.B.S साठी पात्र ठरला आहे. त्याच्या या यशाबद्दल विद्यादीप शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.अक्षय माने, मुख्याध्यापिका अर्चना दुधाळ, सहकारी शिक्षक यांच्या वतीने सत्कार शाळेत करण्यात आला.
श्रेयश हा काळेवाडी परिसरातील सर्व सामान्य कुटुंबातून मराठी माध्यमाच्या शाळेत शिकून त्याने हे उज्ज्वल यश प्राप्त केले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
Tags: काळेवाडीकाळेवाडीतील श्रेयस कुलकर्णीचे 'नीट'च्या परिक्षेत घवघवीत यशघवघवीत यशडॉ.अक्षय मानेनीट परिक्षामाने इंग्लिश स्कूलमाने स्कूलविद्यादीप शिक्षण संस्थाश्रेयस कुलकर्णी























Join Our Whatsapp Group