पुणे – महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) तोट्यात असल्याने यावर्षी कर्मचाऱ्यांना बोनस देता येणार नसल्याचे पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, बोनस न मिळाल्यास उपोषण करण्याचा इशारा कामगार संघटनांनी दिला आहे.
पीएमपीचा तोटा ३४३ कोटी रुपयांच्या घरात गेला आहे. तसेच दोन्ही महापालिकांकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. महापालिकेने सर्वसाधारण सभेत पीएमपी कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा ठराव मंजूर केला होता. परंतू, पीएमपी तोट्यात असल्याने कर्मचाऱ्यांना बोनस देता येणार नसल्याचे मुंडे यांनी सांगितले. तसेच पीएमपी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या बोनसबाबत महापालिका नव्हे तर पीएमपी निर्णय घेईल असे ही त्यांनी स्पष्ट केले.
पीएमपीच्या निर्णयाला विरोध दर्शवत इंटकने बोनस आणि सानुग्रह अनुदानाची रक्कम न दिल्यास १२ ऑक्टोबरपासून धरणे तर १६ ऑक्टोबरपासून उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे कामगार विरुध्द प्रशासन असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.