आळंदी (Pclive7.com) प्रसाद बोराटे :- महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील यांनी आज आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचे सहकुटुंब दर्शन घेतले. यावेळी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त विकास ढगे तसेच अभय टिळक यांनी त्यांचा शाल, श्रीफळ तसेच श्री ज्ञानेश्वर दर्शन पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, विरोधी पक्षनेते डी.डी. भोसले, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, आळंदी पोलीस स्टेशनचे मच्छिंद्र शेंडे, विकास कुऱ्हाडे, रोहित तोडकर, पत्रकार आरिफभाई शेख, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, संदीप रंधवे, हभप गोविंद महाराज गोरे तसेच आळंदी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. त्यानंतर दिलीपराव वळसे पाटील यांनी माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे यांच्या संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट घेतली. यावेळी शिक्षण मंडळाचे मा. सभापती श्रीधर कुऱ्हाडे, मा. शिक्षणाधिकारी सुनील कुऱ्हाडे, ज्ञानेश्वर गुळुंजकर हे उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group