पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे निलख, विशाल नगर येथील अखिल विशाल नगर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने स्व. सुरज काळूराम नांदगुडे यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव सचिन साठे, पीसीएमटी चे माजी चेअरमन दिलीप बालवडकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदकुमार बालवडकर, सांगवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोपे, निवृत्त पोलीस अधीक्षक श्रीकांत पाटील तसेच काळूराम नांदगुडे, रवींद्र काटे, भुलेश्वर नांदगुडे, विजय पाटुकले, अनंत कुंभार आदी उपस्थित होते. या रक्तदान शिबिरात ८५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
























Join Our Whatsapp Group