पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे निलखच्या विशालनगर येथील निको स्काय पार्क को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये अनोख्या पद्धतीने भोंडला साजरा करण्यात आला. या सोसायटीतील रहिवासी महिलांनी स्विमिंग पूलमध्ये भोंडल्याची पारंपारिक गाणी म्हणत साजरा करण्यात आला.

सदर भोंडल्याचे नियोजन शिरीष पत्की यांनी केले होते. जे स्वतः तेथील रहिवासी, उत्तम दर्जाचे स्विमर आणि कोच आहेत. या कार्यक्रमासाठी श्रीमती कीर्ती देव यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्या स्वतः नॅशनल लेव्हलच्या गोल्ड मेडलिस्ट, मास्टर स्विमर आहेत. ओपन वॉटर स्विमिंग मध्ये पाच किलोमीटरमध्ये सुद्धा त्या गोल्ड मेडलिस्ट आहेत. आधुनिकता आणि संस्कृती अशा दोघांची सांगड घालून देणारा हा कार्यक्रम होता. एका वेगळ्या पद्धतीने सादर केलेला हा भोंडला सर्वांच्या आकर्षणाचे कारण ठरला.
निको स्काय पार्क सोसायटी, नेहमीच सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहाने आणि एकत्रितपणे वर्षानुवर्षे राबवत आली आहे.
























Join Our Whatsapp Group