पिंपरी (Pclive7.com):- चिखलीतील कुदळवाडी येथील मोरे पाटील चौकात वाहतूक पोलिसांची नेमणूक करा अशी मागणी स्विकृत सदस्य दिनेश यादव यांनी केली आहे. यासंदर्भात यादव यांनी तळवडे चिखली वाहतूक पोलीस विभागाला निवेदन दिले आहे.

दिनेश यादव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चिखलीतील कुदळवाडी परिसरातील मोरे पाटील चौकात वाहनांची रहदारी वाढली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. विशेषतः सांयकाळच्या सुमारास वाहनांच्या संख्येने चौकात मोठी गर्दी होते.
या गर्दीतून पायी जाणाऱ्या नागरिकांसह वाहन चालकांच्या किरकोळ अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे येथील चौकात कायमचा वाहतूक पोलीस नेमण्यात यावा, अशी मागणी दिनेश यादव यांनी निवेदनाद्वारे तळवडे-चिखली वाहतूक पोलीस विभागाकडे केली आहे.
Tags: dinesh yadavKudalwadiMore Patil ChowkTraffic Policeकुदळवाडीचिखलीदिनेश यादवमोरे पाटील चौकवाहतूक पोलीसवाहतूक पोलीसाची नेमणूक करास्विकृत नगरसदस्य
























Join Our Whatsapp Group