पिंपरी (Pclive7.com):- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभागीय आयुक्तालय, पुणे आणि प्रतिभा महिला प्रतिष्ठान यांच्या वतीने ४ डिसेंबर रोजी सांगवी येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्या माध्यमातून अधिकाधिक बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे यासाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्यासह संपूर्ण भाजपची टीम मैदानात उतरली आहे. या मेळावा यशस्वी करण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन नाव नोंदणीसाठी प्रयत्न करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

प्रत्येकाच्या हाताला काम मिळावे, अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे. त्यासाठी शासनस्तरावर देखील प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून राज्य शासनाच्या वतीने ठिकठिकाणी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले जाते. पुणे जिल्हा व पिंपरी चिंचवड मोठ्या प्रमाणात कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये मनुष्यबळाची आवश्यकता असते. मात्र ही माहिती प्रत्येकापर्यंत पोचत नाही. त्यासाठी राज्य शासनाच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावे, यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या रोजगार मेळाव्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. शहरातील प्रत्येक घरामध्ये जाऊन भाजप कार्यकर्ते रोजगार मेळाव्यासाठी नोंदणी करीत आहेत. या रोजगार मेळाव्यामध्ये सातवी ते पदव्युत्तर, आयटीआय पासून ते अगदी अभियंता पदवी घेतलेल्या तरुणांना रोजगाराची संध्या उपलब्ध आहे. या मेळाव्यामध्ये सात हजार ३०० हून अधिक रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यामुळे बेरोजगार तरुणांचेही या मेळाव्याकडे लक्ष लागले आहे. नवी सांगवी येथील द न्यू मिलेनिअम इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्रांगणात ४ डिसेंबर रोजी सकाळी नऊ ते दुपारी चारच्या दरम्यान हा मेळावा होणार आहे. जास्तीत जास्त तरुणांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन शंकर जगताप यांनी केले आहे.





















Join Our Whatsapp Group