पुणे – कामावर असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या पोलीस हवालदार सुभाष गुळींक यांच्या कुटुंबियांना अभिनेता अक्षयकुमार याने दिवाळीचे औचित्य साधून २५ हजार रुपयांची मदत आणि मिठाई सोबत शुभेच्छा पत्र पाठविले आहे. या मदतीमुळे गुळींक कुटुंबिय भारावून गेले असून त्यांनी अक्षयकुमार याचे आभार मानले आहेत.
सुभाष गुळींक हे पोलीस हवालदार या पदावर कंट्रोल रूममध्ये कार्यरत होते. ४ जानेवारी २०१७ रोजी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्यामध्ये त्यांच्या मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी गुळींक यांच्या बोरावकेनगर येथील निवासस्थानी कुटुंबियांना मदतीचा धनादेश सपुर्द केला.