पिंपरी (Pclive7.com):- विवाहितेच्या डोळ्यात मिरची पूड टाकून सासरच्यांनी तिचा छळ केला. याप्रकरणी पती, जाऊ आणि दोन दिरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १३ सप्टेंबर २०२१ ते २७ डिसेंबर २०२२ या कालावधीत चऱ्होली फाटा, भोसरी येथे घडला आहे.
या प्रकरणी पती चंद्रकांत पांडुरंग काळे (वय २८), दीर दीपक पांडुरंग काळे (वय ४०), दीर भरत पांडुरंग काळे (वय ३७), जाऊ (सर्व रा. दिघी, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पीडित महिलेने दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी महिला सासरी नांदत असताना आरोपी जावेने त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. तू परत नांदण्यासाठी कशी आली. तुला आमच्या घरात घेणार नाही. तू काळी तू आहेस, असे म्हणून आरोपींनी तिला मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. तुला नांदायला यायचे असेल तर तुझ्या आईकडून एक लाख रुपये घेऊन ये, असे म्हणत विवाहितेला उपाशी ठेवून तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दिघी पोलिस तपास करीत आहेत.