पिंपरी (Pclive7.com):- “स्वर्गीय शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेला प्रमाण मानून कार्य करणाऱ्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला अनेक नेतेमंडळी आणि कार्यकर्ते जोडली जात आहेत. शिवसेनेची विचारधारा सोबत घेऊन आगामी महापालिका निवडणूकीच्या अनुषंगाने आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याचा आवाका पाहून राज्यभर जसे मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहे तसेच पिंपरी चिंचवड शहरातील कार्यकर्ते , नेते पदाधिकारी अशा शेकडो जनांचा पक्षप्रवेश होत आहे.
येत्या मंगळवारी (दि.१७) रोजी सकाळी अकरा वाजता निगडीतील सिझन बंक्वेट हॉल येथे विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश होणार असून, शिवसैनिक पदाधिकारी यांच्यासाठी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिव संजय माशीलकर, उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील, उपनेते खा. श्रीरंग बारणे, उपनेते तथा राज्य अल्पसंख्याक कक्ष प्रदेशप्रमुख इरफानभाई सय्यद उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. पक्षाचे जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, बाळासाहेब वाल्हेकर, उपजिल्हा प्रमुख संजय वाबळे, संभाजी शिरसाठ, शहर प्रमुख नीलेश तरस, युवा सेनेचे विश्वजीत बारणे, महिला संघटिका सरिता साने त्याच बरोबर पिंपरी चिंचवड शहरातील पदाधिकारी उपस्थित राहणार असून सर्व महिला आघाडी, युवासेना पदाधिकारी, पक्षाच्या सर्व अंगीकृत संघटना आणि समस्त शिवसैनिकांनी या मार्गदर्शन मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन मेळाव्याचे स्वागतोत्सुक उपनेते तथा अल्पसंख्यक कक्षाचे प्रदेशप्रमुख इरफ़ान सय्यद व आयोजकांनी केले आहे.