पिंपरी (Pclive7.com):- खेळाडूंनी पिंपरी चिंचवड शहराचे नाव रोशन करावे असे आवाहन खासदार श्रीरंग बारणे यांनी केले. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या वतीने मुंबई येथे भरविण्यात आलेल्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेमध्ये कु.प्रणव प्रमोद गायकवाड याने प्रथम क्रमांक मिळविला. तसेच३५ वी सब ज्युनिअर सॉफ्टबॉल स्पर्धा आंध्र प्रदेश येथे पार पडलेल्या या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघानी ब्रांस पदक पटकावले त्यामध्ये राष्ट्रीय खेळाडू कु.अनोश अनिल कांबळे ह्यांचा सत्कार खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळेस पिंपरी चिंचवडचे नाव खेळाडूंनी देशात रोशन करावे असे आवाहन खासदारांनी व्यक्त केली.

यावेळी जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शिवसेना शहरप्रमुख निलेश तरस, युवासेना शहर प्रमुख विश्वजीत बारणे, पिंपरी युवा अधिकारी निलेश हाके, सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा कुटे, प्रमोद गायकवाड, युवा सेना विभाग संघटक विशाल भातंबरेकर उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group