पिंपरी (Pclive7.com):- दिन दलितांचे गोरगरिबांचे कैवारी दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. यावेळी श्री अक्कलकोट स्वामी समर्थ ट्रस्ट व कै.भिमराव जवळकर, प्रतिष्ठानच्यावतीने वतीने कासारवाडी येथील डी.एम.के इंटरनॅशनल स्कूलमध्ये भाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना पिंपरी चिंचवड शहर जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रकाशतात्या जवळकर, स्विकृत नगरसेवक संजयभाऊ कणसे, उद्योजक रघुनाथ जवळकर, सामाजिक कार्यकर्त्या सौ.प्रतिभा जवळकर यांनी भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी डी.एम.के इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड शहर जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रकाशतात्या जवळकर, अक्कलकोट स्वामी समर्थ ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष संजय कणसे, प्रतिभा जवळकर, रघुनाथ जवळकर यांच्या हस्ते दहावी परीक्षेमधील बसलेल्या विद्यार्थ्यांना त्यांना गाईड्स देऊन त्यांना दहावीच्या अभ्यासासाठी मदत करण्यात आली.
यावेळी तात्या जवळकर, अंबादास साठे, मंगेश मोरे, सागर फुगे, कैलास जाधव, मोनिका कर्नावट, ममता कांबळे, महानंदा स्वामी, ज्ञानेश्वरी काळे, महानंदा स्वामी, भाग्यलक्ष्मी सल्ला, कृतिका गवस, दीप्ती घोरपडे, अमृता दीक्षित आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन अजय जाधव यांनी केले तर आभार प्रतिभा जवळकर यांनी मानले.