पिंपरी (Pclive7.com):- कोरोना काळात मोदी सरकारने कोणताही मागचा पुढचा विचार न करता लावलेला लॉकडाऊन आणि त्यामुळे अनेकांची झालेली उपासमार, झालेली फरफट, आबालवृद्धांनी शेकडो मैल दूरवर केलला पायी प्रवास कोणीच विसरू शकत नाही. या कोरोना काळात भाजपने उत्तर भारतीय लोकांवर केलेला अन्याय विसरू नका असे आवाहन माजी नगरसेविका शीतल नाना काटे यांनी केले.

काळेवाडी प्रभाग ३१ आणि ३२ मधील आयोजित केलेल्या उत्तर भारतीय नागरिकांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी नगरसेवक संतोष कोकणे, नगरसेवक विनोद नढे, दिलीप आप्पा काळे, शिवसेनेचे उपविभाग प्रमुख सागर शिंदे, प्रभागाचे निरीक्षक शाम अण्णा लांडे, निरीक्षक, राहुल भोसले, निरीक्षक इखलास सय्यद, प्रसाद कोलते, महिला अध्यक्षा कविता आल्हाट, शीतल हगवणे आदी उपस्थित होते.

याउलट कोरोना काळात महाविकास आघाडीने खऱ्या अर्थाने सर्व सामान्य लोकांना न्याय देण्याचे काम केले. उद्धव ठाकरे, अजितदादा पवार, राजेश टोपे यांनी केलेल्या चांगल्या नियोजनामुळे महाराष्ट्रात कोरोना आटोक्यात आला. महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे याना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन यावेळी शीतल काटे यांनी केले.
यावेळी विनोद नढे, संतोष कोकणे, इखलास सय्यद यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवनाथ नढे, बजरंग नढे, ब्रिजेश सिंग, रणधीर सिंग, उमेश सिंग, मनन सिंग, राम पती मौर्य, रमेश नखाते, बजरंग नढे यांनी परिश्रम घेतले.
























Join Our Whatsapp Group