पिंपरी (Pclive7.com):- एका महिन्यामध्ये तीन वेळेपेक्षा जास्त वेळा उशिरा आल्यास किंवा केवळ एक वेळ थम्ब केल्यास त्या कर्मचाऱ्यावर कारवाई करणे गरजेचे आहे. मात्र, संबंधित विभागप्रमुखांकडून कारवाई केली जात नसल्याचे चित्र दिसत आहे. यापुढे बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाई न करता त्यांना पाठीशी घालणाऱ्या विभागप्रमुखांवरच कारवाई केली जाणार आहे, असा सक्त इशारा पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने दिला आहे.

महापालिकेच्या विविध विभागांमधील विभागप्रमुखांनी कर्मचाऱ्यांचा हजेरी अहवाल प्रशासन विभागाकडे पाठवले जात नाहीत. तपासणी पथकाने पाहणी केल्यानंतर बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जात नसल्याचे आढळून आले आहे.

महापालिकेमध्ये अनेक विभागांमध्ये कर्मचारी काम करतात. त्यांच्या हजेरीसाठी फेस रिडींग सिस्टीम लावण्यात आली आहे. मात्र, अनेक कर्मचारी वेळेत येत नाहीत. फेस रिडींग करून बाहेर निघून जातात. अशा बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जात नाही.
या संदर्भात संबंधित विभागप्रमुखांनी त्याबाबतचा अहवाल २७ फेब्रुवारीपर्यंत सामान्य प्रशासन विभागाला पाठवावा. तसे न केल्यास विभागप्रमुखांवर कारवाई करण्याचा इशारा सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी दिला आहे.
























Join Our Whatsapp Group