पिंपरी (Pclive7.com):- काळेवाडी येथे संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनकडून रक्तदान शिबिराचे रविवारी संत निरंकारी सत्संग भवन येथे आयोजन करण्यात आले होते. ३८३ भक्तांनी निस्वार्थ भावनेने रक्तदान केले.
यशवंतराव चव्हाण रक्तपेढी यांनी १६३ युनिट, ससून रुग्णालय रक्तपेढी यांनी १०० युनिट, संत निरंकारी रक्तपेढी यांनी १२० युनिट रक्त संकलन केले. या शिबिराचे उदघाटन ताराचंद करमचंदानी (पुणे झोन प्रभारी) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. दरम्यान या रक्तदान शिबिराला अनेक सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी संत निरंकारी सेवादलचे क्षेत्रीय संचालक किशनलाल अडवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली, मिशनचे सेवादार,अनुयायी यांनी योगदान दिले. आभार गिरधारीलाल मतनानी (पिंपरी सेक्टर प्रमुख) यांनी केले.