पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहराच्या नावलौकिकात भर टाकणार्या पिंपळे सौदागर येथील लिनीअर गार्डनचे काम प्रगतीपथावर आहे. या उद्यानाच्या सौंदर्यात आणखी भर पडावी म्हणून येथील स्थानिक रहिवाशांनी नवीन कल्पना सुचविल्या. राष्ट्रवादीचे नगरसेवक नाना काटे यांनी नागरिकांसोबत या उद्यानाचा पाहणी दौरा करून सूचना ऐकून घेत त्याची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले.
पिंपळे सौदागर प्रतिडेक्कन म्हणून नावारूपाला आले आहे. येथे कोकणे चौक ते स्वराज गार्डन चौकापर्यंत बी.आर.टी.लगतच्या जागेत अद्ययावत लिनीअर गार्डन विकसित करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. लिनीअर गार्डनमुळे शहराच्या नाव लौकिकात भर पडणार आहे. या गार्डनच्या उभारणीत येथील स्थानिक रहिवाशांच्या संकल्पनेतुन सुशोभिकरणात भर टाकता येईल त्यासाठी परीसरातील सोसायटीचे चेअरमन यांच्यासोबत विद्यमान नगरसेवक नाना काटे यांनी लिनीअर गार्डनची व रोझलँड रेसिडेंसी शेजारील गार्डन पहाणी केली. यावेळी नागरीकांना नगरसेवक नाना काटे यांनी कामाची प्रत्यक्ष माहिती दिली. तसेच नागरीकांनी केलेल्या सूचना ऐकून घेतल्या.























Join Our Whatsapp Group