पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथील हॉटेल गोविंद गार्डनच्या बासुरी बँक्वेट हॉल, याठिकाणी ‘ऑल सिनियर सिटीजन असोसिएशन’ या जेष्ठ नागरिक संघाचा सातवा वर्धापन दिन आणि वार्षिक सभा पार पडली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक शत्रुघ्न (बापु) काटे उपस्थित होते.

याप्रसंगी श्री. विलासकाका जोशी यांची “ऑल सिनियर सिटीजन असोसिएशन” चे नवीन अध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी बापु काटे यांनी आपले विचार व्यक्त करतांना सांगितले कि, “सन २०१६ रोजी या जेष्ठ नागरिक संघाची बीजे रोवली होती आणि रोवलेल्या या बी चे आज वटवृक्षात झालेले रूपांतर हे खूप सुखावणारं आहे.” आज साधारण ४३८ जेष्ठ नागरिक या संघाचे सभासद आहेत. तसेच यावेळी बापु काटे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि हा संघ दिवसेंदिवस असच बहरत राहो अशी भावना व्यक्त केली. तसेच नवनियुक्त अध्यक्ष श्री. विलासकाका जोशी यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे शत्रुघ्न काटे, कैलास कुंजिर, निर्मलाताई कुटे, श्री संजय भिसे, मनोज ब्राह्मणकर आणि ऑल सिनियर सिटीजन असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.























Join Our Whatsapp Group