
यंदाच्या वर्षी मानाचे वारकरी ठरले मु पो. वाकडी, ता. नेवासा, जिल्हा – अहमदनगर येथील भाउसाहेब मोहनीराज काळे (वय 56), मंगल भाऊसाहेब काळे (वय 52). हे शेतकरी दांपत्य 25 वर्षापासून भास्कर गिरी महाराज यांच्या सोबत देवगड ते पंढरपूर पायी वारी करत आहेत.
कामातून विरोधकांच्या टीकेला उत्तर देईन”
“मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. माझ्या हातून जेवढं सर्वसामान्य लोकांचं काम होईल, राज्याच्या विकासाचं काम होईल हाच माझा आणि आमच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा प्रयत्न आहे. विरोधकांकडे विरोध आणि आरोप याशिवाय दुसरं काहीच नाहीये. आरोप आणि टोमणे. त्यामुळे त्यांच्याकडे आम्ही लक्ष देत नाही. त्यांच्या आरोपांना एकनाथ शिंदे कामातून उत्तर देईल. महाराष्ट्रातली जनता सूज्ञ आहे. काम करणारे लोक कोण आहेत, हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे”, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी विरोधकांच्या टीकेला खोचक प्रत्युत्तर दिलं.
सर्वांना विश्वासात घेऊनच पंढरपूरचा विकास
पंढरपूर मंदिराच्या विकास आराखड्याबाबत सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेण्यात येणार नाही असे मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले. तसेच पंढरपूरातील विठ्ठल रुक्मिणी मंदीरातील कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवून त्यांना दिलासा देण्यात आला असल्याचे यावेळी बोलताना सांगितले. तसेच पंढरपूर शहरातील प्रलंबित पाणीपुरवठा योजनेसाठी १०९ कोटी तर शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी १०८ कोटी रुपये मंजूर केल्याचे यावेळी जाहीर केले.
























Join Our Whatsapp Group