पिंपरी (Pclive7.com):- क्रांती फाउंडेशन व श्री साईनाथ तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने १० वी व १२ वीतील गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा व करीअर मार्गदर्शन शिबीर मोहननगर चिंचवड़ येथे आयोजित करण्यात आला होता.

यावेळी श्री. गणेश लंगोटे (अध्यक्ष क्रांती फाउंडेशन) करिअर मार्गदर्शक प्रा. विजय नवले, श्री. अमित गोरखे (पिंपरी विधानसभा समन्वयक), कैलास कुटे, सौ.मनीषाताई शिंदे, उद्योजक बाळासाहेब बच्चे, गजानन पोटघन आदि उपस्थित होते.

प्रा. विजय नवले यांनी १० वी व १२ वी नंतर विविध शाखेतील तसेच प्रवेश प्रक्रियेची सखोल माहिती दिली. विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा व सकारात्मकतेचे गुरु मंत्र दिले. प्रास्ताविक गणेश लंगोटे यांनी केले. सूत्र संचालन शारदाताई मुंडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यास गणेश लंगोटे, शुभम् पिंपळे, उदय नामदे, चेतन बोरकर, सचिन नामदे, पंकज घुले, सागर नामदे, प्रसाद हिरणवाळे, शुभम नामदे, राहुल बोरकर, मनेश नामदे, ऋषिकेश नामदे, वैभव भागानगरे, विकास नामदे, गणेश चव्हाण, ओंकार जैद, बाबु नामदे, दिलीप बोरोले, विराज नामदे, जय दहिहंडे, संतोष राठोड, राहुल मिसाळ यांनी परिश्रम घेतले.
Tags: १० वी१२ वीअमित गोरखेकरिअर मार्गदर्शक प्रा. विजय नवलेक्रांती फाउंडेशनगणेश लंगोटेगुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानमोहननगरमोहननगर येथे क्रांती फाउंडेशन व श्री साईनाथ तरुण मंडळ यांच्या वतीने १० वी १२ वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानश्री साईनाथ तरुण मंडळ





















Join Our Whatsapp Group