पिंपरी (Pclive7.com):- राज्याचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे व शिवसेनेचे पिंपरी चिंचवड शहर संघटक सचिन सानप यांचा वाढदिवस (दि.२७) रोजी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. सचिन सानप युवा मंचच्या वतीने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

दि.२७ रोजी सकाळी ८ वाजता पुर्णानगर शनी मंदिर ग्राउंड येथे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच सकाळी ९ वाजता रायरेश्वर मंदीर, कृष्णानगर या ठिकाणी अभिषेक करण्यात आला. दुपारी १२ वाजता अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांना फळवाटप करण्यात आले. सोनवणे वस्ती, चिखली या ठिकाणी दुपारी ३ वाजता अपंग आश्रम, यमुनानगर या ठिकाणी फळवाटप करण्यात आले. गणेश मंदीर, महात्मा फुलेनगर या ठिकाणी संध्याकाळी ६ वाजता १० वी व १२ वी मधील १२० गुणंवत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. संध्याकाळी ७.३० वाजता गणेश मंदीर, महात्मा फुलेनगर येथे अभिष्टचितंन सोहळा संपन्न झाला.

अशा प्रकारे दिवसभर विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, शिवसेना जिल्हा संघटिका सुलभाताई उबाळे, भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, जेजुरी देवस्थानचे अध्यक्ष तुषार सहाने, युवा सेना शहरप्रमुख अजिंक्य उबाळे, भोसरी विधानसभा संघटक रावसाहेब थोरात, सर्जेराव आबा भोसले, आशाताई भालेकर, दादा नरळे, परशुराम आल्हाट, नेताजी काशीद, युवराज कोकाटे, अनिल सोमवंशी, ऋषिकेश जाधव, सुनील कदम साहेब, पी.टी चौधरी, अनिल भोसले, अमित शिंदे, श्रीकृष्ण काशीद, विजय घोडके, महादेव पाटील या कार्यक्रमास उपस्थित होते.

कार्यक्रमाचे व्यवस्थापन यशवंतभाऊ कन्हेरे, शिवानंदभाऊ चौगुले, बाबा देसाई, प्रदीप सकपाळ, स्वप्निल शिरसाठ, आकाश पाटील, राहुल ठाकरे, संतोष केंगार, स्वप्निल कांटे, निखिल कांटे, मोहन मांडोळे, स्वप्निल कांबळे, किशोर पवार, ऋषिकेश पवार यांनी केले होते.
Tags: Sachin Sanapshivsenaवाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजराशिवसेना शहर संघटकशिवसेना शहर संघटक सचिन सानप यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरासचिन सानप






















Join Our Whatsapp Group