पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजोग वाघेरे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत बॉडीपल्स थेरेपी कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले आहे. हा कॅम्प उद्या गुरूवार दि.२४ ते दि.२५ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १० ते ६ यावेळेत संजोग वाघेरे पाटील यांच्या संपर्क कार्यालयासमोर पिंपरीगाव येथे होणार आहे.
या कॅम्पमध्ये मधुमेह, पार्किन्सन, व्हेरिकोज व्हेन्स, सांधेदुखी, थायरॉईड, पाठदुखी, कंबरदुखी, निद्रानाश, अर्धांगवायू , टाचदुखी, सायटीका, गुडघेदुखी, मायग्रेन, स्पॉंडिलेसिस, मासिक पाळीत होणारा त्रास, हार्मोन्स प्रॉब्लेम्स, अन्नपचन संबंधित समस्या, मज्जातंतू व स्नायू संबंधित समस्या, वजन वाढणे व कमी होणे या आजारावरती थेरेपी केली जाणार आहे.
या मोफत बॉडीपल्स कॅम्पचे आयोजन माजी नगरसेविका उषाताई वाघेरे पाटील, युवानेते ऋषिकेश वाघेरे पाटील यांच्यावतीने करण्यात आले आहे. तरी पिंपरीगाव व परिसरातील जास्तीजास्त नागरिकांनी या थेरेपी कॅम्पचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी विशाल हेडगिरे – 9834119002, गौरव वाघेरे – 8446200702 यांच्याशी संपर्क साधावा.