पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शेअर बाजारात झालेल्या नुकसानातून कर्जबाजारी झालेल्या एका ३४ वर्षीय तरुणाने आठव्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली आहे. शहरातील चऱ्होली फाटा येथे शनिवारी (दि.२) रात्री अडीच वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. समाधान दत्तात्रय आहेर (वय ३४, रा. चऱ्होली फाटा, मूळ रा. बार्शी, सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, समाधान याने शेअर बाजारात गुंतवणूक केली होती त्यामध्ये त्याला मोठे आर्थिक नुकसान झाले. सोबतच समाधान कर्जबाजारी झाला त्यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलत राहत्या घराच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या प्रकारानंतर त्यास पिंपरी-चिंचवड मधील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले.
आत्महत्याग्रस्त समाधान यांच्या मागे पत्नी, आठ महिन्यांचा मुलगा, आईवडील आहेत. समाधान हा शेअर बाजारात गुंतवणूक करत होता त्यामध्ये त्याला नुकसान झाले त्यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. त्याची पत्नी ही माहेरी होती तसेच आईवडील गावी होते. अशी माहिती समाधान यांच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिली. पुढील तपास पोलिस करत आहेत.




















Join Our Whatsapp Group