पिंपरी (Pclive7.com):- नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या सौजन्याने रविवार (दि.०१) रोजी पिंपळे सौदागर येथील गोविंद यशदा चौक याठिकाणी “मेरी माटी मेरा देश” हे अभियान पार पडले. यावेळी परिसरातील उपस्थित नागरिकांनी अमृत कलशमध्ये मूठभर माती संकलित करून शहिदांना आदरांजली अर्पण केली.

शत्रुघ्न काटे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देश अमृत महोत्सव साजरा करीत असताना देशातील शहिद वीरांना सन्मानित करण्यासाठी “मेरी माटी मेरा देश” या उपक्रमाची सुरुवात केली. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिले. स्वातंत्र्यलढ्यात अनेक क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, ज्ञात-अज्ञात देशवासियांनी प्राणांची आहुती दिली. त्यांच्या त्यागामुळे स्वातंत्र्याची पहाट आपण बघत आहोत. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष होत असतानाच त्यांच्या या त्यागाचे स्मरण करणे आपले सर्वांचे आद्य कर्तव्य आहे.”मेरी माटी, मेरा देश” या अभियानाच्या माध्यमातून देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या, सर्वस्व गमावलेल्या, बलिदान दिलेल्या त्या सर्व ज्ञात, अज्ञात देशवीरांप्रती नतमस्तक होण्याची, अभिवादन करण्याची संधी आपल्या प्रत्येकाला मिळाली आहे. ज्यांनी मिळालेले स्वातंत्र्य अखंड, अबाधित ठेवण्यासाठी प्राण खर्चिले, त्यांना सलाम, वंदन, प्रणाम करण्याचा, त्यांच्याप्रति नतमस्तक होण्याचा हा उपक्रम आहे असे नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले.
अमृत कलशात संकलित केलेली माती दिल्ली येथे शहीद वीर यांच्या स्मरणार्थ कर्तव्य पथावर बांधलेल्या अमृत वाटीकेला अर्पण केली जाणार आहे.























Join Our Whatsapp Group