पिंपरी (Pclive7.com):- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलेल्या आवाहना नुसार राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त व ‘सेवा पंधरवडा’ या कार्यक्रमा अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका ‘ह ‘प्रभागाच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 30 फुगेवाडी -दापोडी स्वच्छता ही सेवा’ या कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी युवासेना व गणेश एलाईट बिल्डिंग तर्फे करण्यात आले.

यामध्ये गणेशनगर भागातील रोडवरील सर्व गवत, कचरा गोळा करण्यात आला. ह्यावेळेस निलेश हाके, सौरभ पवार, मुकुंद कुलकर्णी, रवींद्र काळे, जितेंद्र दांडूविया, सौ.सोनाली नागदेवते, सौ. प्रजनी बाविस्कर, सौ. सुनीता काटे, सौ. करिष्मा बाविस्कर, श्रीमती. रोहिणी पवार, सौ. तृप्ती नवलकर उपस्थित होते.
























Join Our Whatsapp Group