पिंपरी (Pclive7.com):- शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सोमवारी थेरगाव येथील नवरात्र उत्सवास भेट देऊन देवीची आरती केली. यावेळी आदित्य ठाकरे आणि पुणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार सचिन अहिर यांचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले यांनी भक्ती शक्ती शिल्पची प्रतिकृती देवून स्वागत केले.

थेरगाव – वाकड रोड येथील ॲड. सचिन भाऊ भोसले युवा मंच, न्यू आझाद युवक संघ, जिजाऊ महिला संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हभप जयश्री येवले या गायनाचार्य हभप शंकर महाराज इंगोले आणि लक्ष्मण महाराज पांचाळ यांचे कीर्तन झाले. आदित्य ठाकरेंच्या स्वागतासाठी युवक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
ॲड. सचिन भोसले यांच्या कार्यालयासमोर ठाकरे यांच्या वाहनावर ढोल ताश्याच्या गजरात, फटाके फोडून जेसीबी मधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, जिल्हा संघटक सुलभा उबाळे, माजी शहर प्रमुख योगेश बाबर, महिला शहर प्रमुख अनिता तुतारे, माजी नगरसेवक अनंत कोऱ्हाळे आदींसह शहर कार्यकारिणी सदस्य व प्रमुख पदाधिकारी बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group